---Advertisement---

Dhule Crime News : लाचखोर निरीक्षकाच्या घरात सापडले ५० लाखांचे घबाड

---Advertisement---

धुळे : दुकानाच्या स्थळ परीक्षणासाठी आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख (४४, फ्लॅट नंबर २०२, मोरया हाइट्स, मानराज पार्क स्टॉप, नवजीवन सुपर शॉपीच्या मागे, द्रौपदी नगर, जळगाव) व खाजगी इसम तुषार भिकचंद जैन (३६ मराठी गल्ली, शिरपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली होती.

लाचखोर देशमुखाच्या जळगावातील घराची स्थानिक एसीबीने झडती घेतल्यानंतर तब्बल ३१ लाख ३० हजार शंभर रुपयांची रोकड, १७ लाख ४६ हजार १०० रुपयांचे दागिने व २२ हजार ७६० रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. धुळ्यातील घरातून ७५ हजार ८१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत आहेत.

असे आहे लाच प्रकरण
३४ वर्षीय तक्रारदाराला शिरपूर येथे पशु-पक्षी फार्मचे दुकान सुरू करावयाचे असल्याने त्यांनी दुकानाचा परवाना मिळण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लाचखोर अधिकाऱ्याने आठ हजारांची लाच मागितली व एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी खाजगी पंटर जैन यास पारोळा चौफुलीवर पकडण्यात आले. त्यानंतर अधिकारी देशमुख यासदेखील अटक करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment