---Advertisement---

Rules Change Update: नागरिकांनो लक्ष द्या! १ मे पासून रेल्वे तिकीट ते एटीएम व्यवहारात होणार बदल, खिशावर होईल परिणाम

Rules Change Update
---Advertisement---

Rules Change Update: एप्रिल महिना संपत आला आहे. देशात १ मे पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. हे नियमबँकिंग, रेल्वे प्रवास आणि गॅस सारख्या सुविधा संबंधित आहे. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एटीएम व्यवहार शुल्कात वाढ केल्याने मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे.

रेल्वे प्रवास

रेल्वे मंत्रालयाने १ मे पासून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. वेटिंग तिकिट असलेल्या प्रवाशांना आता स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. याशिवाय, आगाऊ आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी केला जाईल. तिकीट बुकिंग, रद्द करणे आणि तत्काळ कोट्याशी संबंधित शुल्क देखील वाढू शकते.

एटीएम व्यवहार

रिझर्व्ह बँकेने १ मे पासून एटीएममधून पैसे काढणे आणि इतर सेवांवरील शुल्क वाढवले ​​आहे. जर तुम्ही मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले तर आता तुम्हाला प्रति व्यवहार १९ रुपये द्यावे लागतील (पूर्वी १७ रुपये होते). शिल्लक तपासण्यासाठी देखील ७ रुपये आकारले जातील (पूर्वी ६ रुपये होते). तसेच, ठेवी आणि मिनी स्टेटमेंट सारख्या सेवांवर अतिरिक्त शुल्क देखील लागू होऊ शकते.

एलपीजी सिलिंडरच्या किमती

एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या गेल्या होत्या. आता मे महिना सुरू होणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा आढावा १ मे रोजी घेतला जातो. अशा परिस्थितीत, त्याच्या किमतीत बदल अपेक्षित आहे.

बँकिंग सेवांमध्ये बदल

देशातील ११ राज्यांमध्ये ‘एक राज्य, एक आरआरबी’ धोरण लागू केले जाईल, ज्या अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण केले जाईल. यामुळे बँकिंग सेवांमध्ये सुधारणा होईल आणि ऑपरेटिंग खर्च कमी होईल.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment