नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर डोपिंग प्रकरणी तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने (नाडा) ही कारवाई केली. त्याची माहिती अॅथलेटिक इंटिग्रिटी युनिटला (AIU) देण्यात आली आहे. दरम्यान, बंदीची शिक्षा भोगणारी ती नागपूरची आता तिसरी खेळाडू ठरली आहे. यामुळे नागपूरच्या गौरवशाली ॲथलेटिक्स परंपरेला धक्का बसला आहे.
नुकतेच नाडाने धावपटूच्या लघवीचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली. निकिताने 19-Norandrosterone (प्रतिबंधित अॅनाबॉलिक स्टिरॉइड) घेतल्याचे तपासणीत आढळून आले. माहितीनुसार, या पदार्थावर इंटरनॅशनल अॅथलेटिक्स फेडरेशनने ३० वर्षांसाठी बंदी घातली आहे. हा पदार्थ प्रामुख्याने स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरला जातो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नाडाने निकितावर तीन वर्षांची बंदी घातली.
गेल्यावर्षी बंगळूर येथे झालेल्या विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेत २५ वर्षीय निकिताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.
त्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी पथकाने (नाडा) तिच्या युरीनचा नमुना घेऊन चाचणी केली होती. त्यात तिने १९- नोरँड्रोस्टेरोन हे बंदी असलेले ॲनाबोलिक स्टेरॉईड घेतल्याचे सिद्ध झाले होते. यावर आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाने ३० वर्षापासून बंदी टाकली आहे. याचा वापर मुख्यत्वे स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी केला जातो. बंदीचा कालावधी २ मे २०२२ पासून ग्राह्य धरण्यात आला असून हा कालावधी १० जुलै २०२५ रोजी संपुष्टात येईल.