मुंबई : महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवारांच्या गटात सामील झालेल्या रुपाली चाकणकरांनी येथील भर सभेत शरद पवारांसोबत असलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
कोणाच्या विरोधात, संघार्षात किवा टीका करत नाही, मात्र जर यासंदर्भात बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “शरद पवारांनी ओळख दिली. साहेब आमचं दैवत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या विरोधातील कोणतीही भूमिका घेणार नाही, मात्र याचा अर्थ असा नाही की, शरद पवारांसोबत जे नेते आहेत, ते त्यांच्या विरोधात नाही.
त्यामुळे आजची बैठक शरद पवारांचा विचार घेऊनच होत आहे. हा विचार कोणाच्या विरोधात, संघार्षात किवा टीकेसाठी नाही मात्र जर यासंदर्भात बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे”, असा घणाघात रुपाली चाकणकरांनी केला आहे.