जळगाव : नशिराबाद येथील सिका ई मोटर्स प्रा.लि. या कंपनीने एस बोल्ट ही नवीन इलेक्ट्रीक मोटारसायकल निर्मित केली असून गुरुवार रोजी वितरण करण्यात आले. यावेळी श्री साईराम प्लॉस्टिक्स अॅण्ड इरिगेशनचे संचालक प्रमोद पाटील, बांधकाम व्यावसायिक शेख जहिर शेख हाफिज, धनराज चौधरी, अनंत बागुल, प्रवीण महाजन, प्रवीण पाटील, संजय दांडगे उपस्थित होते.
इलेक्ट्रिक वाहन वापरा प्रदूषण मुक्त करा
खानदेशातल्या प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून आपला परिसर प्रदूषण मुक्त करण्याचे आवाहन प्रमोद पाटील यांनी यावेळी केले.
१४० किलोमीटर धावते
ही मोटरसायकल प्रति चार्ज 140 किलोमीटर धावते. या मोटारसायकलमध्ये डिजिटल डिस्प्ले, रिजनरेटिव्ह कंट्रोलर, युएसडी सस्पेंशन, अँटीथेफ्ट अलार्म सिस्टिम, रिव्हर्स गियर, साईड स्टॅन्ड सेन्सर, ट्युबलेस टायर्स असून चार आकर्षक रंगात उपलब्ध आहे.
नोकरीची कास न धरता व्यवसायाभिमुख व्हा!
खानदेशातील जळगाव सारख्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारसायकलचे उत्पादन होणे ही सर्व खानदेशवासीयांना अभिमानाची बाब आहे. तरुणांनी श्रीराम पाटील यांचा आदर्श घेऊन नोकरीची कास न धरता व्यवसायाभिमुख व्हावे, तसेच छोटा का असेना पण व्यवसाय उभारून गरजूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी कंपनीचे जॉईंट डायरेक्टर डॉ. अमोल पाटील, सीइओ राजेंद्र तेलोरे, मॅनेजर अविनाश पाटील, नितेश पाटील, तुषार महाजन, प्रवीण महाजन, कृष्णा वाघ यांनी परिश्रम घेतले.