उमेश पालच्या हत्येनंतर फरार असेलला माफिया अतिक अहमदच्या मेहुण्याला यूपी एसटीएफने अटक केली आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी अशरफ अहमदचा मेहुणा सद्दाम याला दिल्लीतील मालवीय नगर येथून अटक करण्यात आली आहे. सद्दामवर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. तो त्याच्या गर्लफ्रेंड अनमला भेटायला जात होता तेव्हा यूपी एसटीएफने त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना टाळण्यासाठी सद्दाम नाव बदलून कर्नाटक, मुंबई आणि दिल्लीत लपून बसला होता. चौकशीत आरोपी सद्दामने सांगितले की, अटक टाळण्यासाठी तो दिल्ली, कर्नाटक आणि मुंबईतील ठिकाणे बदलत होता.
उत्तर प्रदेश पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, तो आज आपल्या मैत्रिणीला भेटायला जात होता. एफआयआरनुसार त्याच्या मैत्रिणीचे नाव अनम आहे. यापूर्वी तो बरेली येथील खुशबू एन्क्लेव्हमध्ये राहत होता.
अशरफ अहमद तुरुंगात असताना त्याला तुरुंगात रसद पुरवायची. त्यासाठी त्याने कारागृह अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली होती. अश्रफ तुरुंगात असताना बाहेरची सर्व कामे सद्दाम सांभाळायचा. सद्दाम जमिनीच्या व्यवहारापासून पैशांच्या वाहतुकीपर्यंत सर्व गोष्टींसाठी जबाबदार होता.
पोलिसांच्या चौकशीत सद्दामने त्याच्यासोबत वादग्रस्त जमीन व्यवसायात गुंतलेली आणखी काही नावे उघड केली आहेत. एफआयआरनुसार सद्दामसह लल्ला गद्दी नाजीश, सय्यद साहेब फुरकान हे लोक वादग्रस्त जमिनींमध्ये हस्तक्षेप करून पैसे कमवत होते.