---Advertisement---

Malegaon Bomb Blast Case : ‘मला माझ्याच देशात…’, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया

---Advertisement---

---Advertisement---

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यात भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचाही समावेश होता. दरम्यान, निर्दोष मुक्त झाल्यानंतर प्रज्ञासिंग ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या की मी न्यायाच्या आदरामुळे आले आहे. मला १३ दिवस छळण्यात आले, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. १७ वर्षे माझा अपमान करण्यात आला. माझ्याच देशात मला दहशतवादी बनवण्यात आले.

प्रज्ञासिंग ठाकूर यांचे वकील जेपी मिश्रा म्हणाले की, काल देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, हिंदू दहशतवादी असू शकत नाही आणि आज न्यायालयानेही हा निर्णय दिला हा योगायोग आहे. हा केवळ योगायोग आहे, पण हिंदू दहशतवादी असू शकत नाही हे सिद्ध झाले आहे.

न्यायालयाने काय म्हटले?


महत्त्वाचे पुरावे आणि पंचनामा व्यवस्थित झाला नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हट्ले आहे. याप्रकरणी भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह अनेकांवर आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---