Sahitya Akademi Award 2023 : मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार यंदा (sahitya akademi award 2023) कोल्हापुरातील कृष्णात खोत (krushnat khot) यांच्या ‘रिंगाण’ (ringan) या कांदबरीला जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील ‘रिंगाण’ चा समावेश झाला आहे. एक लाख रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
काेल्हापूरातील कृष्णात खोत यांनी रिंगाण या कादंबरीचे लेखन केले आहे. त्यांनी या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे. साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.
कृष्णात खोत यांच्या रिंगाणला पुरस्कार मिळाल्याने काेल्हापुरातील लेखकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. खाेत यांच्यावर समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. एक लाख रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 रोजी करण्यात येणार आहे.