जळगाव : खासगी व सरकारी क्ष्ोत्रातील दुवा म्हणून ‘सहकार भारती’ काम करत आहे. सहकारातून विकास करणे आणि आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्ष्ाम करणे यासाठी ‘सहकार भारती’ कार्यरत असल्याचे मत ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोळ यांचा ‘तरुण भारत लाईव्ह’शी संवाद साधताना व्यक्त केले.
‘सहकार भारती’ची 600 जिल्ह्यात व्याप्ती
‘सहकार भारती‘ची व्याप्ती नागालॅड, मणिपूर, सिक्कीम, नेपाळ यासह देशभरात आहे. जवळपास 600 जिल्ह्यांपर्यंत ‘सहकार भारती’ पोहचली आहे. पूर्वी सहकार भारती बॅंक आणि पतपेढीपर्यंत मर्यादित होती. आता मात्र विविध क्ष्ोत्रांची राष्ट्रीय अधिवेशने घेण्यास सुरवात केली असून, 16 क्ष्ोत्रात काम करत आहे. यात बँकांच्या सायबर सिक्युरीटीवर पुण्याला अधिवेशन घेतले होते. त्यात 550 प्रतिनिधी आले होते. मच्छिमार को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अधिवेशन घेतले.
त्यात 24 राज्यांमधून 850 प्रतिनिधी आले होते. दिल्लीत झालेल्या पतपेढींच्या अधिवेशनात 20 राज्यातील 1200 पतपेढ्यांतील सुमारे 5 हजार प्रतिनिधी आले होते. महिलांच्या अधिवेशनात 24 राज्यातील 413 जिल्ह्यातील 2,767 महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. फेबु्रवारी 2024 मध्ये मुंबईला हौसिंगचे अधिवेशन होत आहे. टॅक्सबाबतचे अधिवेशन हुबळी कर्नाटकमध्ये, 23 ते 26 ला नागपूर येथे बचत गटांच्या महिलांचा सहकार मेळावा होत आहे, तर मार्चमध्येही मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सहकार क्ष्ोत्रात योगदान
सहकार भारतीच्या सहकार क्ष्ोत्रातील योगदानाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, सहकार क्ष्ोत्रात काम करणारी एकमेव संस्था म्हणजे सहकार भारती होय. सहकार क्ष्ोत्रात विविध स्तरावरील 17 फेडरेशन आहेत, तर 350 जिल्ह्ास्तरावरील फेडरेशन आहेत. या फेडरशेनमधील समस्या सोडवण्यावर काम ते करत आहेत. सहकार भारतीला को-ऑपरेटिव्ह क्ष्ोत्र विकसीत करायचे आहे. सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक प्रगती झाली पाहिजे. आर्थिक उन्नतीही सहकाराशिवाय होऊ शकत नाही. आपल्याकडे खासगी व शासकीय असे दोन क्ष्ोत्र आहेत. खासगी क्ष्ोत्राचे असे आहे की समोरच्याचे काय होईल ते मला माहिती नाही. 1 रुपयाचा पेन आहे तो 10 रुपयाला कसा विकेल हे पाहिल.
मात्र सरकारी क्ष्ोत्र असे आहे की एक रुपयाचा पेन एक रुपयालाच दिला पाहिजे. या दोघांचा मधला दुवा म्हणजे सहकार भारती होय. यातून सामान्य माणसाचे शोषण थांबविण्याचे काम सहकार भारती करत आहे. आताची स्थिती पाहिली तर गरीब अधिक गरीब होत आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे.
श्रीमंत व गरीबीचीही ही जी दरी आहे ती दरी कमी करण्याच काम सहकार भारती करत आहे. रोजगार उपलब्ध करणे, गावाचा विकास करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, महिलांना आत्मनिर्भर करणे, घर बांधण्यासाठी सहकार्य करणे यासारखी विविध कामे करत आहे. सामान्य माणसांच्या छोट्या-छोट्या अडचणीही सोडवण्याचे काम सहकार भारती करत आहे.
सहकार मंत्रालयातर्फे लाभ
सहकार मंत्रालय स्थापन करण्यात सहकार भारतीचे मोठे योगदान आहे. पूर्वी हे कृषी विभागात जोडले होते. कृषीमंत्र्यांना कृषी क्ष्ोत्र सोडून सहकार क्ष्ोत्रात इन्टरेस्टच नसायचा. त्यामुळे याकडे दुर्लक्ष्ा होत होते. सरकार प्रत्येक गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टी सहकार भारतीच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. यासाठी सहकार भारतीने प्रयत्न केले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नाने 2019 मध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना केली. अमित शहा यांचा सहकारातील चांगला अनुभव आहे. त्यामुळे ते सहकारचे महत्त्व आणि खाचखळगेही जाणतात. सामान्य माणसाला काय लाभ होऊ शकतात हेही ते जाणतात. आता त्याची सुरवात झाली आहे.
राज्यातील सहकार मंत्र्यांच्या काळात अनेक बँका बंद पडल्या. आता हे काम सहकार मंत्रालयाअंतर्गत आणून त्याच्यावर आरबीआयतर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे बँका व सहकार क्ष्ोत्रातील पैसे सुरक्ष्ाित राहत आहेत. सहकार भारतीने 1 लाख रुपयांना 5 लाखापर्यतचा विमा दिला. देशातील सर्व बँका संगणकीकृत करून पारदर्शकता आणली. गावातील सोसायटीतर्फे नागरिकांना अर्थपुरवठा केला जात आहे. सोसायट्यांना संगणीकृत केल्याने युवकांना रोजगार मिळाला.
साखर कारखाने, सूतगिरणीच्या विकासात योगदान
साखर कारखाने व सूतगिरणींच्या विकासात सहकार भारतीच्या योगदानाबाबत माहिती देताना संजय पाचपोळ म्हणाले, पंढरपूरला 22 साखर कारखान्यांचे अधिवेशन घेतले. साखर कारखान्यात राजकारण आल्याने ते डबघाईला गेले आहेत. सहकार भारतीने सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा करून 10 हजार करोड रुपये कारखान्यांचा कर माफ केला. सूतगिरणीकडे सरकारने लक्ष्ा दिले नाही. जर याकडे लक्ष्ा दिले तर 60 ते 62 आमदार या जोरावर निवडून येतील. सहकार भारतीने यात लक्ष्ा देणे सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.