अनैतिक संबंधातून सायबूपाडा गावातील तरुणाचा खून : आरोपीला अटक

तरुण भारत लाईव्ह न्युज भुसावळ : रावेर तालुक्यातील सायबूपाडा-निमड्या रस्त्यावरील अली नाल्याजवळ 30 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. रावेर पोलिसांनी 24 तासात तपासचक्रे फिरवून खुनाचा उलगडा केला आहे. संजय रेमसिंग पावरा (30, सायबूपाडा नवाड, ता.रावेर) या तरुणाच्या खून प्रकरणी किनेश उर्फ किन्या सजन पावरा (28, सायबूपाडा नवाड, ता.रावेर) या तरुणास अटक करण्यात आली आहे. मयताचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयित आरोपीला संशय होता व त्यातून त्याने हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

अनैतिक संबंधातून तरुणाला संपवले


सायबूपाडा गावातील संजय पावरा या तरुणाचे घराशेजारी राहणार्‍या विवाहितेशी अनैतिक संबंध असल्याचा महिलेच्या पतीला संशय होता व 7 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संशयित आरोपी किनेश पावरा याने सायंकाळी संजय यास गावाबाहेर नेवून त्यास दारू पाजली व तो मद्यधूंद होताच त्याच्या डोक्यात व तोंडावर मोठा दगड टाकला. दगडाच्या प्रहाराने व मेंदूला मार लागल्याने संजय याचा जागीच मृत्यू ओढवला. खुनानंतर संशयित घरी परतला मात्र घटनास्थळी मयताचा फुटलेला मोबाईल, दोन रीकाम्या दाूरच्या बाटल्या तसेच मयताची दुचाकी आढळल्यानंतर तज्ज्ञ ठसे टिपले तसेच श्वानाने काही अंतरापर्यंत माग दाखवला.

तांत्रिक पुराव्याअंती आरोपी जाळ्यात


पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासल्यानंतर घटनास्थळी मयत व आरोपी यांचे लोकेशन मिळाल्यानंतर संशयित किनेश पावरा यास ताब्यात घेण्यात आले. पावरा हा दुचाकी दुरुस्तीसाठी रावेरात आल्यानंतर त्याने जणू काही आपल्याला माहित नाही असा आर्विभाव आणला मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे संशयीताने कबुल केले आहे.

यांनी उघडकीस आणला खून


फैजपूर पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन नवले, कल्पेश आमोदकर, किशोर सपकाळे, सचिन घुगे, मनोज काटे, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, अमोल जाधव, विकार शेख, उमेश नरवाडे, रवींद्र भामरे, मुकेश मेढे, दीपक ठाकुर, सुरेश मेढे, समाधान ठाकुर व स्थानिक गुन्हे शाखेचे नाईक नितीन बाविस्कर, संदीप सावळे, ईश्वर पाटील, भारत पाटील, महेश महाजन, मोतीलाल चौधरी आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.