सलई डिंकाची तस्करी, दोघांना वनविभागानं ठोकल्या बेड्या

रावेर : रावेर अभरण्यातून सलई डिंकाची तस्करी करणार्‍या दोघांना वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा लावून ताब्यात घेतल्याने अवैधरीत्या तस्करी करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मंगळवार, 21 फेब्रुवारी रोजी रात्री वनसरंक्षक दिगंबर पगार, यावल उपवनसंरक्षक विवेक होंसिंग तसेच यावल सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीद्वारे रावेर वनपरीक्षेत्र अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी सापळा रचत अहिरवाडी-रावेर रस्त्याने अवैध गौण वनउपज (सलई डिंक) वाहतूक करणारे दोन दुचाकी अडवल्या. दुचाकी क्रमांक एम.एच.19 सी.के.0447 व एम.एच.20 बी.यु.3425 द्वारे तब्बल 140 किलो वजनाचा व 30 हजार रुपये किंमतीचा डिंक वाहून नेला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने संशयित आरोपी नजीर अन्वर तडवी व संजू बिराम तडवी (कुसुंबा, ता.रावेर) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई रावेर वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, अहिरवाडी वनपाल राजेंद्र सरदार, जीन्सी वनरक्षक रमेश भुतेकर यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.