---Advertisement---

जळगावात स्वातंत्रवीर सावरकरांना वीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे अभिवादन

---Advertisement---

जळगाव : स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती वीर सावरकर रिक्षा युनियनचे संस्थापक तथा जिल्हा अध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या नेतृत्वात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वीर सावरकर रिक्षा युनियनच्या ऑफीसपासून सर्व रिक्षा चालक, मालक व शहरातील नागरिकांतर्फे रॅली काढण्यात आली.

युनियनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या आवाहनाला दाद देऊन फुले मार्केट, दादा वाडी, खोटेनगर, अग्रवाल, आकाशवाणी, ईच्छादेवी, दाणा बाजार, महाराणा प्रताप स्टॉप, शिव कॉलनी, गणेश कॉलनी, कुसुंबासह जळगाव शहरातील अनेक भागात रॅली काढण्यात आली. रिमांड होम येथे बिस्कीट पुड्यांचे वाटप मान्यवाराच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास जळगाव जिल्हापेठ चे पोलीस निरीक्षक उल्हास सराटे, जळगाव वाहतूकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेरसिंग चौहान , डॉ. मुळीक , जेष्ठ विधी तज्ञ अँड. शुशिल अत्रे. गोसेवावर्ती , पृथ्वी बचाव चे अध्यक्ष व जेष्ठ विधी तज्ञ अँड. विजय काबरा , सु .ग. देवकर शाळेच्या मूख्याध्यापिका साळुंखे,ला.ना. शाळेचे मूख्याध्यापक सचिन देशपांडे ,समाजसेवक वाल्मिक सपकाळे, रमेश पहलानी , पोलिस हवालदार चंद्रकांत पाटील , ज्ञानेश्वर बागुल , पोलीस नाईक विजय पाटील , विठ्ठल मुंढे आधी उपस्थित होते.

जळगाव येथे वीर सावरकर रिक्षा युनियनच्या ऑफीस परिसरातील शाळेच्या प्रागणांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऑफिस समोर रोडवर सर्व रिक्षा लावून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वीर सावरकर यांच्या प्रतीमेंचे पुजन व नमन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यात ऍड. सुशील अत्रे यांनी वीर सावरकरांचा जिवनप्रवास नजरेसमोर ऊभा केला. त्यानंतर उल्हास सराटे आणि सुमेरसिंग चौहान यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती हिताचे आहे हे समजून सांगितले. ऍड. विजय काबरा यांनी आपल्या मनोगतात वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि कायद्यातील तरतूदी तसेच वाहनासाठी इन्शुरन्स चे फायदे समजावून सांगितले. गोसेवेबद्दल व पर्यावरणाबद्दल महत्व सांगितले ते पुढे म्हणाले की, सावरकरांचे लिखाण वाचल्यानंतर ते डोक्यात भिनल्याशिवाय राहणार नाही.

आमचे सदैव समाजसेवेचे योगदान राहील व कायद्याचे व वाहतुकीचे नियम संघटनेचे सदस्य पाळतील असे आस्वासन संस्थापक अध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी दिले. स्वातंत्र्य चौक पर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत एकनाथ बारी, सुभाष महाजन, दीपक जोशी , भूषण शशिकांत जाधव , सोमनाथ पाटील, सुभाष सौचे ,गोपाल आहीरे, शशिकांत जाधव, कैलास विसपुते, मुकेश चौधरी, पोपट ढोबळे, विवेकानंद बागुल, संजय ठाकूर, गणेश ठाकूर, भास्कर ठाकूर, भुषण भोई, सौरभ नाटुंगे, किरण मराठे, विशाल सोनवणे, संदीप सोनार , किशोर मोरे , संभाजी पाटील, रमेश सोनार, विक्रम पवार, दिपक जोशी, गणेश राऊत, गणेश गुजर, बाळू माळी यांनी सर्व रिक्षा चालकांना पथसंचलन करण्यात मदत केली तद्नंतर स्वातंत्र्य चौकातील स्वातंत्र्य विर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

विर सावरकर रिक्षा युनियनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी आपल्या युनियनच्या माध्यमातून केलेल्या कामाचे दाखले देऊन प्रत्येक रिक्षा चालकांच्या समस्या कार्यालयातून समन्वयाने सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत व पुढे ही हे कार्य असेच चालू राहील असे निवेदन केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन आदिवासी आश्रम शाळा शिक्षक महेश शिंपी सर यांनी केले तर आभार समाजसेवक श्री वाल्मिक सपकाळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भानुदास गायकवाड, सागर सोनवणे, अरुण पाटील , अभिजित बाविस्कर, शिवाजी पाटील , राहुल पाटील , अजय पाटील, शांताराम पाटील, अशोक सपकाळे, सुरज पाटील, सुभाष चौधरी, शेख इरफान , रमेश ठाकूर, संजय मराठे, शांताराम पाटील, सुनील चौधरी, लाला पंचाळ, प्रेमकुमार गवळी, हर्षल पाटील, ईश्वर पाटील जय बजरंग, दिलीप पाटील, समाधान पाटील, किशोर शिंपी, हेमंत चौधरी, भुषण वाग, भुषण कोळी, तानाजी कासब, फकिरा मराठे, भुषण मराठे, संदीप ढबाळे, बबन राठोड, गोविंदा कंझर, गोकुळ राठोड, भुषण कोळी, स्वप्निल कोळी, एकनाथ पाटील, झुलेलाल पवार, गणेश ठाकूर,हितेश पवार आदींसह रिक्षा युनियनच्या सर्व सदस्यांनी , रिक्षा चालक मालक , विद्यार्थी वाहतूक संघटना व शहरातील नागरिकांनी मेहनत घेतली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment