फक्त ४ हजारात मिळणार ‘हा’ 5G स्मार्टफोन

तरुण भारत लाईव्ह । १३ मार्च २०२३ । तुम्हाला जर नवीन फोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशात फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे. त्यामुळे आता बाजारात फाईव्ह जी फोनची मागणी वाढली आहे. तुम्हाला जर फाईव्ह जी मोबाईल घ्यायचा असेल तर सॅमसंग M ५३ हा फक्त ४,००० मध्ये तुम्ही सहज खरेदी करू शकता.

सॅमसंग गॅलेक्सि M 53 हा स्मार्टफोन तुम्ही केवळ ४,००० मध्ये खरेदी करू शकता. ६ जीबी रॅम आणि १२८ इंटर्नल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलेक्सि M 53 स्मार्टफोनची किंमत ३२, ९९९ रुपये आहे. पण अमेझॉन वर ३३ टक्के डिस्कॉउंटवर हा स्मार्टफोन २१, ९९९ रुपयांना सेलसाठी लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोन वर १८,०५० रुपयांची एक्सचेन्ज डिस्काउंट दिला जात आहे. तुम्ही एक्सचेन्ज चा पुरेपूर फायदा घेतल्यास तुम्ही हा स्मार्टफोन फक्त ४,००० खरेदी करू शकता.

या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ६ जीबी रॅम आणि १२८ इंटर्नल स्टोरेज, ६.७ इंचाचा सुपर आल्मोण्ड डिस्प्ले मिळेल. या स्मार्टफोन मध्ये ५००० मह ची बॅटरी मिळेल. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ४ कॅमेरे आहेत. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा १०८ मेगा पिक्सल, दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी ३२ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.