---Advertisement---
जळगाव : यावलच्या साकळी येथील ११ वर्षीय बालकाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी पाजल्याचा दारू संतापजनक प्रकार समोर आला आहे. नशेत हा अल्पवयीन मुलगा बेशुद्ध पडला होता. या प्रकरणी त्याच्या पालकांनी यावल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
रसाड गावातून वाळू घेऊन जाणाऱ्या काही अज्ञात ट्रॅक्टर चालकांनी त्याला घरासमोरून सोबत घेतले आणि नंतर दारू पाजली. ही गंभीर अवस्था पाहून काही जागरूक नागरिकांनी त्याला तातडीने त्याच्या घरी पोहोचवले.
त्याला तातडीने यावल उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळीच्या सुमारास संबंधित अज्ञात वाळू ट्रॅक्टर चालकांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.
वाहनाची धडक, तरुण ठार
यावलच्या मांगी – रिधुरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत विजय विनोद कोळी (वय २४, रा. करंजी, ता. यावल) याचा मृत्यू झाला आहे. विजय हा एम.एच.१९, डी. जे. ४६९४ या दुचाकीने बोरावर येथे जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. तो जागीच ठार झाला.
या प्रकरणी फैजपूर पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अनिल पाटील करीत आहेत. या घटनेनंतर करंजी गावात शोककळा पसरली होती.









