चाळीसगाव : बोढरे गावलगत जंगलपरिसरातुन चंदनाचे लाकूड तोडून, तस्कारी करणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली आहे. ही कारवाई २१ रोजी करण्यात आली असून त्यांच्याकडून ५.१५० कि.ग्रॅम. लाकडासह लाकूड तोडीचे साहित्य ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा जंगल गस्ती करत असताना, २१ रोजी बोढरा गावामधील कक्ष क्रमां क.३१३ मध्ये दोन संशयात्मक इसम आढळून आले. वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा यांनी संबंधित इसमाला अटकाव करुन चौकशी केली असता, त्याच्याकडील एका नायलॉन पिशवीत ताज्या तुटीचे चंदन गाभा लाकूड ५.१५० कि.ग्रॅम. एक विना दांडा लोखंडी कुर्हाड, एक लाहन लोखंडी करवत तसेच दोन आयटेल कंपनीचे साधे मोबाईल मिळून आले.
याबाबत वनकर्मचार्यांनी अधिकची चौकशी केली असता, बोढरा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये सदर इसमांनी चंदनाची झाडे तोडून त्यापासून सुगंधित चंदन लाकूड गाभा करवत व कुर्हाडच्या सहाय्याने तयार करुन एका नायलॉनच्या पिशवीमध्ये जमा केल्याचे आढळून आला. सदरचा मुद्देमाल वनपाल, बोढरा यांनी जप्त करुन भारतीय वन अधिनियम प्रमाणे विविध कलमांद्वारे चाळीसगाव पोलिसात सलमान खॉं. अबरार खॉं. पठाण, वय ३२ व शाबीर खॉ. अजमेर खॉं. पठाण, वय २४ दोन्ही रा.कुंजखेडा, ता.कन्नड, जि. औरंगाबाद यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघे आरोपींना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता, आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई वनपाल डि.के.जाधव, वनरक्षक अजय महिरे, अमित पाटील, जुनोने, रहीम तडवी, प्रसाद कुलकर्णी, अशोक मोरे, विशेष वनरक्षक, उमेश सोनवणे, बापू अगोणे, लालचंद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, संरक्षण मजूर यांनी केली आहे. सदरची कार्यवाही मोहन नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद आशा चव्हाण, सहा. वनसंरक्षक (वन्यजीव), कन्नड, ज्ञानेश्वर देसाई, वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास डि.के.जाधव, वनपाल, बोढरा हे करीत आहे.