मराठवड्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला संघ परिवार

---Advertisement---

 

छत्रपती संभाजीनगर : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व काही ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे मराठवाड्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावे चिखलाने व कमरेइतक्या पाण्याने वेढली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी तातडीची मदत पुरविण्यात अडचणी येत होत्या. अशा वेळी स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्परतेने सेवाकार्य सुरू केल्याची माहिती विश्व संवाद केंद्राच्या संपादकीय मंडळांनी दिली आहे. संघाच्यां देवगिरी प्रवाह या वर देखील ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

नांदेड जिल्ह्यातील गंगानगर (किनवट) भागात घराघरात पुराचे पाणी शिरल्याने जनतेचे हाल होत होते. अनेकांचे रेशन, गॅस सिलेंडर, लाकडे वाहून गेल्याने स्वयंपाक करणे कठीण झाले, प्रशासनाकडून खिचडी वाटप सुरू असले तरी ती सर्व घरांपर्यंत पोहोचत नव्हती. त्यामुळे २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक स्वयंसेवकांनी शहरातून पोळी करून फूड पॅकेट्स तयार केकेआधी समरसता प्रमुख रमेश आंधळे सर व जिल्हा कार्यकर्ते सोनटक्के सर उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शहरात एकूण ७०० पोळ्यांचे संकलन करून ६० घरांपर्यंत फूड पॅकेट पोहोचविण्यात आले.

उदगीर तालुक्यातील बोरगाव व धड़कनाळ गावांवर १७ व १८ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, पिके आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरात पाणी शिरल्याने घरगुती वस्तु, धान्य व पशुधनाचे नुकसान झाले. या भीषण परिस्थितीत १९ ऑगस्ट रोजी उदगीर शहरातील स्वयंसेवकांनी बोरगाव गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि संकटग्रस्त ४० कुटुंबांना अन्नधान्य किटचे वितरण केले. स्थानिक स्वयंसेवकांनी पुढील काही दिवस अधिकाधिक पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे नियोजन केले असून, सेवाकार्यात समाजबांधवांनीही हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील खडका परिसरात तसेच मुखेड भागात स्वयंसेवकांनी वैद्यकीय मदत, अन्नधान्य, कपडे, पांघरूण आदी जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. मागील तीन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या या मदतकार्यात आतापर्यंत सुमारे २०० कुटुंबांना मदत पोहोचविण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---