Sanjana Jadhav’s vehicle accident । रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना यांच्या गाडीचा भीषण अपघात

Sanjana Jadhav’s vehicle accident । माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, संजना जाधव या आगामी विधानसभा निवडूनक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यांच्या नागरिकांच्या गाठीभेटी वाढवल्या आहे.

दरम्यान, संजना जाधव या आपल्या कारने धुळे-सोलापूर महामार्गावरुन जात होत्या. अशातच चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव जवळ त्यांची गाडी आली असता समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली.

या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसून संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे. तसेच संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप ड्रायव्हर देखील सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.