Sanjay Nirupam : काँग्रेसचे संजय निरुपम यांच्या हाती कमळ की धनुष्यबाण ?

Sanjay Nirupam :  माजी खासदार संजय निरुपम हे  काँग्रेसची साथ  सोडून शिवसेना किंवा भाजपमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चा होत  आहेत.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. मविआचं जागा वाटप ज्या जागांमुळं रखडलं आहे त्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिम जागेचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटानं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयकांची नियुक्ती केलेली आहे. यामुळं ही जागा ठाकरेंकडे जाऊ शकते अशी शक्यता आहे.

 

संजय निरुपम यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. सध्या या मतदारसंघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर हे उमेदवार असू शकतात. रामदास कदम याचं देखील या मतदारसंघावर लक्ष होतं. काँग्रेसला हा मतदारसंघ न मिळाल्यास संजय निरुपम वेगळा निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय निरुपम यांची चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे

 

संजय निरुपम यांनी वेगळा निर्णय घेत पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यास गजानन कीर्तिकर यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. संजय निरुपम की गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी द्यायची हा पेच एकनाथ शिंदे यांच्या समोर उभा राहू शकतो.