जळगाव : जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्याकडून ‘नागरी सत्कार’ प्रसंगी बोलताना अनावधनाने मंत्री अनिल पाटील यांच्यासह भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय उदय बापू यांना ‘डाकू’असे संबोधले गेले होते. त्यामुळे त्यांच्याबद्द्ल कमालीचा नाराजीचा सूर उमटत होता. दरम्यान, त्यांनी आज, मंगळवारी सोशल मिडियाच्या माध्यमातून माफीनामा सादर केला आहे.
काय म्हटलंय माफीनामात?
संजय पवार यांनी माफीनामात म्हटलंय की, आदरणीय स्मिताताई व स्वर्गिय उदयबापु वाघ यांचेवर प्रेम करणारा सहकारी बंधू परीवार यांना नमस्कार. १० सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री अनिल पाटील यांच्या नागरी सत्काराप्रसंगी स्वर्गीय उदय बापू यांचे बद्दल माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चुकीचे बोलले गेले होते.
वास्तविक स्वर्गिय उदयबापू बद्दल माझ्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता, तसेच माझे व स्व.उदयबापू यांचे संबंध खूप स्नेहाचे होते. हे स्मिता ताई यांनाही माहीत आहे. पण तरी माझ्या बोलण्यामुळे ताई व स्व.उदयबापू सहकारी बंधू मित्र परीवार यांच्या भावना दुःखल्या बद्दल व त्रासाबद्दल मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे नमूद केले आहे.