---Advertisement---

Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी; न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले ?

---Advertisement---

शिवसेना खासदार (उबाठा) संजय राऊत हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत. सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे.

100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांचा हात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. मेधा यांनी राऊत यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. तसेच राऊत यांनी आपल्यावरील आरोप निराधार आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले होते. संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरु होती. सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. आता संजय राऊत या निर्णयाला वरच्या कोर्टात म्हणजे उच्च न्यायालयात आव्हान देतात का ? हे पाहावे लागणार आहे.

न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले संजय राऊत ?
मी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, पण त्यांनी असा आदेश दिला यावर विश्वास बसत नाही, असे राऊत म्हणाले. ज्या देशात पंतप्रधान गणेश उत्सवासाठी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन मोदक खातात, त्या देशात न्यायाची अपेक्षा कशी करता येईल, असे राऊत म्हणाले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment