नागपूर : नागपुरात मी आणि उद्धव ठाकरे बॉम्ब फोडणार असं वक्तव्य नागपुरात दाखल होण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र, त्यांच्या या पोस्टमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. काही युजर्सनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कुठं लावलाय हा बॉम्ब पेंग्विन च्या ढुंगxxxमागे की घरकोंबड्याच्या ढुंगxxxxमागे अशा शब्दात युजर्सने राऊतांच्या पोस्टची खिल्ली उडवली आहे. तर, साहेबांचा सुतळी बॉम्ब फुटणार आणि शिल्लक आमदार खासदार शिंदे गटात जाणार. दुपारी १ वाजता सकाळ होते का? असा सवाल उपस्थित केला.
हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत नागपुर येथे दाखल झाले आहेत. यापूर्वी राऊत यांनी नागपूरला बॉम्ब फोडणार असे विधान केले होते. अशातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यामुळे ते ट्रोल होताना दिसत आहेत. आज विधीमंडळात ठाकरे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाप्रश्नी आक्रमक भूमिका मांडली. दरम्यान, ठाकरेंच्या भूमिकेनंतर शुभ प्रभात म्हणत राऊत यांनी सोशल मीडियावर सुतळी बॉम्ब आणि अगरबत्तीचा फोटो शेअर केला. त्यांनी ही पोस्ट अधिकृत सोशल अकाऊंट्स वर शेअर केली.