नाशिक : शिवसेनेत फूट पड्ल्यापासून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच रोजच एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान पुन्हा उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.
काय म्हणाले राऊत?
राज ठाकरे यांची रेकॉर्ड उद्धव ठाकरेंशिवाय पुढे जात नाही. एकनाथ शिंदे असो, नारायण राणे असो की फडणवीस असो यांची रेकॉर्डही उद्धव ठाकरे यांच्या पुढे जात नाही. याचाच अर्थ यांच्या मनात प्रचंड भीती आणि दहशत आहे. हा नेता शिवसेना पुढे घेऊन जाईल आणि आम्हाला घरी बसवेल ही भीती त्यांना वाटते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले आम्हाला मिंधे आणि खोकेवाले म्हटलं आजतं. माझा त्यांना सवाल आहे, मिंधे आणि खोकेवाले का म्हणतात हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा.
अख्ख्या देशात तुमची छी थू होतेय. का होतेय याचा विचार करा. ते थांबवायचं असेल तर निवडणुकीला सामोरे जा. लोक चिडलेले आहेत. शहाणे असाल, इमानदार असाल आणि बंड केलं म्हणतात तर राजीनामा द्या. निवडणुकीला सामोरे जा. त्यातून तुमची खरी ताकद कळेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे यांना ठणकावले.