संजय राऊत म्हणाले, अजित पवार आणि अंधभक्त…

मुंबई : ईव्हीएममध्ये घोळ करता आला असता, तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात गडबड कुणी करू शकत नाही. पराभवाचे कारण काही लोक ईव्हीएमवर ढकलून देत आहेत, असे विधान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेलं नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे, तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देशामध्ये नक्कीच महागाई बेरोजगारी आहे. त्याच वेळेला घटनात्मक पदावर बसलेल्या संविधानाची शपथ घेतलेल्यां कडे डिग्री असायलाच पाहिजे, असा नियम नाही. पण लाखो पदवीधर आणि डिग्री वाले हे बेरोजगार आहेत. हा विषय महत्त्वाचा आहे. पण ज्यांच्याकडे डिग्री आहे ती खरी की खोटी आहे हा विषय समजला महत्त्वाचा आहे. जर अमित शहांनी ही डिग्री दाखवली आहे. त्यावर प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला आदर्शवादी पंतप्रधान लाभलेले आहेत, त्यांच्या डिग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर त्यांच्यावर काही तुलना नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.