Politics Maharashtra : शिवसेनेतील बंडापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक भूकंप झाले आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा एक मोठा भूकंप होणार असल्याचा दावा एका भाजप (BJP) नेत्यानं केला आहे.
काय म्हटलंय भाजप नेत्याने?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 10 जून किंवा त्याआधीच राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत हे शरद पवारआणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ देत नाहीत. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा कट आहे, असाही खळबळजनक आरोप नितेश राणेंनी राऊतांवर केला आहे.
नितेश राणे पुढे म्हणाले की, “मुंबईच्या व्रजमूठ सभेआधी मी सांगितलं होतं की, बिकेसीमध्ये होणारी महाविकस आघाडीची शेवटची सभा आहे. परंतु, लोकांनी मला हलक्यात घेतलं. परंतु, काहीच दिवसांत महाविकास आघाडीकडून सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आता ते भाकीत जसं खरं ठरलं तसचं आता संजय राजाराम राऊत हे 10 जून किंवा त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
त्याबाबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. तुम्ही संजय राऊत यांची भूमिका मागच्या काही दिवसातील पाहिली तर लक्षात येईल की, अजित पवार यांच्या विरोधात त्यांची भूमिका आहे. त्यांची अशी देखील मागणी आहे की, अजित पवार गेले की, मी पक्षात प्रवेश करेल.”