---Advertisement---

संजय राऊतांची हकालपट्टी

---Advertisement---

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल दिल्यामुळे ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर तोफ डागत आहेत. त्यावरुन, शिंदे गटाचे आमदारही पलटवार करताना संजय राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी, असे म्हणतात. त्यातच, आता शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे.

शिवसेनेतील बंडाळीनंतर ४० पेक्षा जास्त आमदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर, लोकसभेतील १८ पैकी १३ खासदारही शिंदे गटात सामिल झाले. त्यामुळे, शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. आता, खासदार संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते गजानन किर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment