---Advertisement---

श्रीकांत शिंदेकडून संजय राऊतांच्या जीविताला धोका; उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्युज l २१ फेब्रुवारी २०२३ l  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जीविताला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडून धोका असल्याचे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पात्रात नमूद केले आहे.

एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची सुपारी ठाण्यातील, गुंड राजा ठाकुर याला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

 

 


गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजा ठाकूरला आपल्यावर हल्ला करण्याची जबाबदारी दिली असल्याचा आरोप राऊतांनी केला असून आपल्या जीविताला धोका असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. आपण लोकप्रतिनिधी असून अलीकडेच राज्य सरकारने आपलं पोलीस संरक्षण काढल्याचा निर्णयाकडेही संजय राऊत यांनी पत्रात लक्ष वेधलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment