भुसावळ : दिल्ली येथील बाबासाहेबांचा बंगला स्मारक बनवला. त्या बंगल्यामध्ये बाहेरून प्रतिकृती जी आहे ती संविधानाची प्रतिकृती दिसते.
त्यात बाबासाहेबांचे भाषण, ग्रंथ वगैरे सगळे ठेवलेले आहे. जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला, तिथला विकास अशी पंच तीर्थ ही मोदी सरकारने घोषित केली. त्यामुळे बाबासाहेबांचा आदर कोण करतय आणि अनादर कोण करत आहे हे इथल्या माझ्या सगळ्या बांधवांनी लक्ष घेतला पाहिजे.
परिस्थिती अशी चालली आहे की काँग्रेस नेहमीच आरोप करते की भारतीय जनता पार्टी हिंदू, मुस्लिम करून देशाला किंवा लोकांना संभ्रमात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका संजय सावकारे यांनी केली.
1