Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. बीडमधील हा प्रकरण अधिक चिघळत असून जनतेचा आणि नेत्यांचा संताप अधिकाधिक उफाळून येतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
आरोपींची संपत्ती जप्त करणे : फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश.
परवाने रद्द करणे : बंदुकींसह फोटो असलेल्या व्यक्तींचे परवाने रद्द करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश.
सर्वपक्षीय मोर्चा
बीडमध्ये आज काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चात महाराष्ट्रभरातून लोकांचा मोठा सहभाग होता. प्रमुख नेते म्हणून संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील, भाजपचे अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. आंदोलकांनी आरोपींना अटक करून फाशीची मागणी केली.
संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया
संभाजीराजे छत्रपती यांनी प्रकरणातील मुख्य आरोपींच्या अद्याप अटक न झाल्याबद्दल सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करत विचारले की, “मुख्यमंत्री खंडणीप्रकरणात दोषी असल्याचे म्हणतात, तरीही आरोपी का मोकाट आहेत?”