बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे केज न्यायालयात आपल्या जबाबाची नोंद करणार आहेत.
भारतीय दंड संहितेच्या कलम १६४ अंतर्गत हा जबाब न्यायालयीन अधिकाऱ्यांसमोर नोंदवला जाणार असून, हा जबाब नंतर बदलता येत नाही. दरम्यान, या प्रकरणात नामांकित सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : Kalyan News : दीर-भावजयच्या नात्याला काळिमा; राहत्या घरात… शहरात खळबळ
यासंदर्भात निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही भेट बंद दाराआड झाली असून, दोघांमध्ये तब्बल दहा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत काय निर्णय झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उज्ज्वल निकम यांना या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नेमण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे या भेटीत त्यासंबंधी चर्चा झाली असावी, असा कयास लावला जात आहे. बीडमधील या खटल्यामुळे राज्यभराचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.