मुंबई: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिलचे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील हॉटेल सहारा स्टारच्या बाहेर भारतीय क्रिकेटपटू आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केल्याप्रकरणी सपना गिलने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, पृथ्वी शॉचे प्रभावशाली लोकांशी संगनमत असल्याचा आरोप सपना गिलने केला असून तिच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. शॉचा मित्र असलेल्या तक्रारदाराने सध्याच्या एफआयआरमध्ये आपल्याला मुद्दाम गोवले असल्याचा आरोपही तिने केला आहे.
शॉच्या निर्देशानुसार कायद्याचा गैरवापर करून त्याने वैयक्तिक सूड घेण्यासाठी, गिलला त्रास देण्यासाठी आणि फसवण्यासाठी कायद्याचा वापर करत आहे. सपना गिल हिच्यावर गुन्हा नोंदवू नये, असे निर्देश पोलिसांना द्यावेत; अशी विनंती या याचिकेत तिच्याद्वारे करण्यात आली आहे. त्यांनी तपास अधिकारी आणि ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यात केली आहे.