ढाका : बांगलादेशमधील गाझी टीव्ही या वाहिनीतील सारा रहनुमा (३२) या महिला पत्रकाराचा मृतदेह येथील तलावात बुधवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, तिचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला, याचे कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, तिच्या कुटुंबाने मृत्यूमागे हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
सूत्रानुसार, साराने मृत्यूच्या आदल्या रात्री फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात तिने मित्र फहीम फैसलला टॅग केलं. काही फोटो पोस्ट केलं आणि संदेश लिहिला. “तुझ्यासारखा मित्र असणं ही खूप चांगली गोष्ट होती. देव नेहमीच तुझ भलं करो. तू लवकरच तुझी सर्व स्वप्न पूर्ण करशील अशी अपेक्षा आहे. आपण सोबत मिळून प्लानिंग केली होती. माफ कर, त्या सर्व योजना आपण पूर्ण करु शकणार नाही. ईश्वर तुला आयुष्यात यश देईल” पोस्टच्या अखेरीस दोन हार्टचे इमोजी सुद्धा टाकले होते.
या पोस्टआधी दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने लिहिलेलं, ‘जिवंतपणी मृत बनून राहण्यापेक्षा मरण केव्हाही चांगलं’ एकूणच या प्रकरणात बरीच रहस्य असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑफिसमधून ती ऑफिसच्या कारने घरी यायची. पण मंगळवारी रात्री ती एक मित्राच्या बाईकवरुन येत होती, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. दरम्यान, साराच्या गाजी टीवी चॅनलचा मालक गुलाम दस्तगीर गाजी याला अटक करण्यात आली आहे.
शेख हसीना यांच्या सजीब वाजेद या मुलाने असा आरोप केला की, साराचा मृत्यू हा विचारस्वातंत्र्यावर झालेला आणखी एक हल्ला आहे. दरम्यान, बांगलादेशला भारताशी सलोख्याचे संबंध हवे आहेत, असे जमात-ए-इस्लामी पक्षाचे प्रमुख शफीकूर रहमान यांनी सांगितले. मात्र, भारताने शेजारी देशांसोबतच्या आपल्या धोरणाचा फेरविचार करावा कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये दुसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.