मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आमदार सरोज आहिर यांनी बाळाला घेऊन उपस्थिती लावली. मात्र, त्यांची गैरसोय झाल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, विधान परिषदेचं आजच्या दिवसभराच कामकाज संपलं असून उद्या दुपारी 12 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे.
काय म्हणाल्या सरोज आहिर?
नागपूरच्या अधिवेशनात मला हिरकणी कक्ष मिळालेलं. पण आत्ता मुंबई मधील अधिवेशनात दिलेल्या हिरकणी कक्षात खुप धुळ आहे. माझ्या बाळाला बर नाहीये. तरी मी जनतेचे प्रश्न मांडण्या करता मी इथे आली आहे. सुडाच राजकारण सोडून तुम्ही काम करा. सरकार माझं बाळ सांभाळू शकत नाही. मी आत्ता अधिवेशनात जात नाही आहे .उद्या जर व्यवस्था झाली नाही तर मी उद्या नाशिक ला निघून जाईन. असा इशाराही आहिर यांनी यावेळी दिला.