तुम्ही पेट्रोल व डिझेल मध्ये रॉकेल भेसळ करतात, पेट्रोल पंपांच्या मालकाकडून खंडणी, सरपंचाची शिक्षा अपिलात रद्द

चाळीसगाव : पेट्रोल पंपांच्या मालकाला ‘आम्ही बॉम्बे व्हिजीलन्स स्क्वॉडचे अधिकारी असून मुंबई येथून आलेलो आहोत, तुम्ही पेट्रोल व डिझेल मध्ये रॉकेल भेसळ करतात’, असे सांगून वेळोवेळी खंडणी वसूल करणाऱ्या तिघांना सावदा पोलिसांनी रंगेहात अटक करून संशयितांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सरपंचासा देखील समावेश होता. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी संशयित आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे.

अधिक माहिती अशी की, वाकडी येथील विद्यमान सरपंचासह ईतर दोघांनी सावदा (ता.रावेर) येथील हाजी ईमदाद अली अख्तर हुसेन या पेट्रोल पंपांच्या मालकाला ‘आम्ही बॉम्बे व्हिजीलन्स स्क्वॉडचे अधिकारी असून मुंबई येथून आलेलो आहोत, तुम्ही पेट्रोल व डिझेल मध्ये रॉकेल भेसळ करतात’, असे सांगून वेळोवेळी खंडणी वसूल केली होती. त्यानंतर पेट्रोल पंपांच्या मालकाने सावदा पोलिसांच्या सहकार्याने तिघांना सापळा लावून खंडणी वसूल करताना रंगेहात पकडले होते. त्यानुसार, तिघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर रावेर न्यायालयाने सरपंच यांना दोन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाच्या विरोधात प्रकाश पाटील यांनी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी आरोपी प्रकाश पाटील यांची रावेर कोर्टाने दिलेली दोन वर्षाच्या सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा रद्द करून त्यांना या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.

या खटल्यात आरोपी प्रकाश पाटील यांच्यातर्फे जळगाव येथील ॲड. निरंजन ढाके यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. भोंबे व फिर्यादीतर्फे ॲड. जगदीश कापडे यांनी काम पाहिले.