शनि होणार वक्री; या राशींच्या लोकांची होणार प्रगती

तरुण भारत लाईव्ह । ३० एप्रिल २०२३। यावर्षी १७ जून २०२३ रोजी कुंभ राशीत शनी पूर्वगामी होणार आहे. काही राशींना शनीच्या प्रतिगामी अवस्थेमुळे फायदा होईल, पण काही राशींसाठी ते अशुभही असणार आहे. कोणत्या राशीसाठी शनिदेवाची ही प्रतिगामी अवस्था शुभ राहणार आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

सिंह रास 
सिंह राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीचा लाभ मिळणार आहे. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या व्यावसायिक व्यव्हारामध्ये नफा मिळेल. थांबलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. कर्ज घेणे आणि देणे टाळा.

धनु रास 
शनीची ही प्रतिगामी अवस्था धनु राशीच्या लोकांना लाभ देणारी आहे. काही क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील. जुन्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यापारी वर्गाला कार्यक्षेत्रात यश मिळेल.  रखडलेली कामे पूर्ण होतील.

मकर रास 
मकर राशीच्या लोकांना शनीच्या प्रतिगामीपणामुळे लाभ होईल. याशिवाय, तुम्ही नवीन मालमत्ता देखील खरेदी करू शकता. मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रेमसंबंधांसाठी चांगला काळ. समाजात मान-सन्मान वाढेल, लोक तुमच्या वागण्याने प्रभावित होतील.

मीन रास 
शनीची ही प्रतिगामी अवस्था मीन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. मीन राशीच्या लोकांना या काळात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात प्रगती होईल. छोट्या व्यावसायिकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.