---Advertisement---

सत्यजित तांबे, नाना पटोले, नाराजी आणि अपमान; वाचा काय घडले अधिवेशनात

---Advertisement---

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरवात झालीय. या अधिवेशनादरम्यान, विधानभवनाच्या पायर्‍यांवरील एक व्हिडीओ राज्यात चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नशिक पदवीधर निवडणुकामध्ये अपक्ष म्हणून अर्ज करणारे सत्यजित तांबे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यातील नाराजी आणि मापअपमान नाट्य स्पष्टपणे दिसून येत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विधानभवनाच्या पायर्‍यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिकार्‍यांशी बोलण्यात गुंग होते तेव्हा सत्यजित तांबेंनी नाना पटोलंना पाहताच ते नानांशी बोलण्यासाठी म्हणून पुढे आले. त्यांनी स्वत; जाऊन नानांची भेट घेत हात मिळवला. नानांनी औपचारिकता म्हणून हात मिळवत तांबेंसोबत बोलणं टाळलं आणि पुन्हा अधिकार्‍यांशी बोलू लागले.

बराच वेळ नाना पटाले तिथे इतर अधिकार्‍यांशी हात मिळवत होते पण तरीही त्यांनी तांबेकडे ना पाहिलं नाही त्यांना बोलण्याबाबत काही प्रतिसाद दिला. यावरून नाना आणि सत्यजित तांबे यांच्यात नाराजीचा सूर अजूनही आहे हे स्पष्ट दिसून आलं आहे. काही वेळ थांबून सगळ्यांशी हात मिळवणी करून सत्यजित तांबे तिथून पुढे निघून गेले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment