सावदा प्रतिनिधी : शहराजवळ गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे. यात तब्बल 28 गुरे असल्याचे सांगण्यात येत असून त्यात 3 गुरे मयत आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रावेर कडून सवद्या कडे येणारे देहराडून पासिंग असलेली गाडी (क्र. DD 01, G 9350) यातून गोवंश वाहतूक होत असल्याची बातमी निभोरा पोलिसांना मिळाली. यावेळी तेथील स.पो.नी. धुमाळ सो व त्यांचे सहकारी यांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न वडगाव गाव जवळ केला. मात्र. ट्रक थाबला नाही त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला व सावदा पो.स्टे. ला याबाबत माहिती कळविली यानंतर सावदा पोलिसांनी सदर गाडी सावदा शहरा बाहेर हॉटेल महेंद्र जवळ अडविली असता त्यातील ट्रक चालक व क्लिनर गाडी सोडून फरार झाले. यावेळी गाडी उघडून बघितली असता यात सुमारे 28 गोवंश (गोऱ्हे) कोंबली असल्याचे दिसले. या सर्व गुरांना खाली उतरविले असता यातील अनेक जखमी होते तर 3 गुरे मयत आढळून आली.
यातील सर्व गुरांना जळगाव येथील बाफना गोशाळेत रवाना करण्यात आले तर ट्रक सावदा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी भेट दिली सदर कार्यवाही सावदा स.पो. नी. देविदास इंगोले, निभोरा स.पो. नी. धुमाळ सो, फैजपूर येथील स.पो. नी. आखेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सावदा येथील पी.एस.आय. समाधान गायकवाड, हे.कॉ. जयराम खोटपे, यशवंत टहाकळे, किरण पाटील, रुस्तम तडवी, यांनी पार पाडली.
दरम्यान मागील महिन्यात चिनावल येथे सुकी नदी पात्रात मेलेली जनावरे फेकून दिल्याची घटना ताजी असतांना आज अवैध गुरे वाहतूक करणारा ट्रक पकडला गेला, यातून रावरे तालुका हा अवैध गुरे वाहतुकीचा हॉट स्पॉट बनल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून पोलिसांन कडून यावर कठोर कार्यवाही व सखोल तपास होत नाही तोपर्यंत यास लगाम लागणार नाही म्हणून पोलिसांनी या अवैध गुरे वाहतुकीकडे लक्ष पुरविण्याची आवशक्यता असल्याचे बोलले जात आहे.