SBI चा २००० रुपयांच्या नोटेबद्दल मोठा निर्णय; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। रिझर्व्ह बँक ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. आता २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म आणि कोणत्याही ओळखीचा पुरावा आवश्यक नसल्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या सर्व शाखांना सूचित केले.

एकावेळी २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत रु. २,००० च्या एक्सचेन्जची सुविधा कोणत्याही फॉर्म शिवाय दिली जाईल. असे बँकेने २० मे रोजीच्या परिपत्रकात म्हटले आहे. आरबीआयच्या या नव्या निर्णयानुसार ज्यांचे बँक खाते नाही ते लोक बँकेत जाऊन २०,००० रुपयां पर्यंतच्या २००० च्या नोटा एकावेळी बदलू शकतात. २३ मे पासून २००० रुपयांच्या नोटा कोणत्याही बँकेत बदलता किंवा जमा करता येतील.

३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत २००० रुपयांच्या नोटा बदलता येतील. एका वेळी २०,००० रुपये बँकेत बदलले किंवा जमा केले जाऊ शकतात. आरबीआयच्या १९ शाखांमध्येही नोटा बदलता येतील याचा अर्थ आरबीआय आणि इतर सर्व बँकेमध्ये नोटा बदलता येतील.