तरुण भारत लाईव्ह न्युज : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता १० वीचा निकाल जाहीर करेल अशी शक्यता आहे. मात्र बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण निकालाची तारीख जशी जवळ येतेय तसे दहावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढत आहे. दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
१) http://www.mahresult.nic.in
३) https://ssc.mahresults.org.in
SSC Result 2023 : असा पाहा निकाल
१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. (आईचे नाव)
४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
५) निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.