तरुण भारत लाईव्ह : एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत आरक्षण लाभासाठी पात्र आहे. या कुटुंबात, आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणारी व्यक्ती, त्याचे पालक आणि 18 वर्षांखालील भावंडे तसेच त्याची/तिची जोडीदार आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांचा समावेश होतो. तसेच उत्पन्नामध्ये पगार, शेती, व्यवसाय, व्यापार इत्यादी सर्व स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होतो
ओबीसी, ईबीसी आणि डिएनटीसाठी दहावीनंतरची शिष्यवृत्ती योजना आणि एससी (PMS-SC) योजनेसाठी दहावीनंतरच्या शिष्यवृत्ती अंतर्गत, ज्या विद्यार्थ्यांच्या आईवडील/पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही अशांना शिष्यवृत्ती दिली जाते.