---Advertisement---
जळगाव : “मित्र संकटातच ओळखले येथील जातात” या उक्तीला साजेसा आदर्श बहादरपूर-जिराळी वर्गमित्रांनी घालून दिला आहे. दुःखावेळी मित्रांच्या कुटूंबियांना मदतीचा आधार मित्रपरिवाराच्या या जिव्हाळ्याच्या कृतीचे संपूर्ण बहादरपूर परिसरात कौतुक होत आहे.
पारोळा तालुक्यातील जिराळी गावचे रहिवासी दिनकर दिगंबर खैरनार (वय ४५) यांचे दि.१८ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. आधीच दारिद्र्याशी झुंजणाऱ्या या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला असतांना संकटकाळी वर्गमित्रांनी खैरनार कुटूंबाला ५० हजार रुपयांचा मदतीचा हात दिला.
हजार शालेय घरखर्च व उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने कु टुंब हतबल झाले होते. ही बाब समजताच बहादरपूर येथील रा. का. मिश्र विद्यामंदिरातील १९९७-९८ मधील दहावीत शिकलेल्या वर्गमित्रांनी काही कालावधीत एकत्रित प्रयत्न करून तब्बल ५० हजारांची रक्कम जमा करून मयत दिनकर खैरनार यांच्या पत्नीच्या हाती सुपूर्द केली.
परिसरात कौतुक
दुःखावेळी मित्रांच्या कुटूंबियांना मदतीचा आधार मित्रपरिवाराच्या या जिव्हाळ्याच्या कृतीचे संपूर्ण बहादरपूर परिसरात कौतुक होत आहे. शालेय जीवनात जुळलेली नाती फक्त आठवणीपुरती मर्यादित न राहता, संकटाच्या प्रसंगी हात देत कु टुंबाला उभारी देऊ शकतात. याचा हा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.