---Advertisement---
पाचोरा : राज्यात विद्यार्थिनींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना समोर येत आहेत.अशातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपळगाव परिसरात स्कुल व्हॅन चालकाने एका विद्यार्थिनींचा तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी आरोपीस अटक केली असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बदलापूर येथील शाळेत चिमुकल्या मुलींच्या अत्याचाराची घटना समोर आली होती. या घटनेचा राज्यभरातून निषेध करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यात सुद्धा नराधम शिक्षकाने आठवीतील सहा मुलींना अश्लिल चित्रफित दाखवून त्यांचा विनयभंग केला. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे शाळेसमोरच नवव्या वर्गातील विद्यार्थिनीचा तरुणाने हात पकडून विनयभंग केला. असाच प्रकार मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडला.
फिर्यादींची अल्पवयीन मुलगी ही उतावळी नदीच्या पुलाचे बाजुला महीलांचे सार्वजनिक शौचालयास गेली होती. तेथुन परत येत असतांना शौचालयाजवळ रस्त्यावर गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल शेंदुर्णी ता. जामनेर या शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करणा-या गाडीवरील चालक अबीद हुसैन शेख (रा. शेंदुर्णी ता. जामनेर)याने मुलीचा पाठलाग करुन तिला थांबविले. अबीद हुसैन शेख याने तु मला खुप आवडतेस असे बोलुन तीचा हात पकडला. ही घटना घडल्यानंतर मुलीच्या पालकाने पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनला आरोपी चालक अबीद हुसेन शेख रा. शेंदुर्णी ता. जामनेर) याचेविरुध्द दाखल केला. त्याच्या विरोधात पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यास मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रात्रीच आरोपीस ताब्यात घेत अटक केली. त्याला बुधवारी (२० ऑगस्ट) रोजी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपीस पुन्हा दि.२१ रोजी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहेत