---Advertisement---
Heat wave : नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात ‘मान्सून’ने नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिरा म्हणजे गुरुवारी संपूर्ण देशातून निरोप घेतला. दरम्यान, काल रात्रीपासून हवामानात बदल होऊन प्रचंड उष्णता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर वाढते जागतिक तापमान, अनपेक्षित उष्णतेच्या लाटा आणि सतत बदलते हवामानवर शास्त्रज्ञांच्या एका गटाने यासंबंधीच्या आकडेवारीचा अभ्यास करून जागतिक तापमानवाढीचा इशारा दिला आहे.
यासाठी पर्यावरण समतोलासाठीच्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर या अहवालानुसार जगात उन्हाळ्याचे सरासरी ५७ दिवस अधिक वाढतील आणि भारतात उन्हाळा ३० दिवस वाढेल, असा इशारा दिला आहे.
२०१५ मध्ये झालेल्या पॅरिस हवामान बदलविषयक कराराचे तंतोतंत पालनच आता यापासून जगाला वाचवू शकेल. ‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन’च्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी या शतकाच्या अखेरपर्यंत सर्व देशांनी सावधगिरीने व प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत तर तापमानवाढीचा हा धोका प्रचंड वाढेल, असा इशारा दिला आहे.
ठोस उपाय काय?
जिवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून तो थांबवणे हा या तापमानवाढीवर ठोस उपाय असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.