नवी दिल्ली : फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केले असल्याने त्यांचे कायद्यात रुपांतर झाले आहे.
भारतीय न्याय (द्वितीय) संहिता २०२३, नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता २०२३, भारतीय साक्ष (द्वितीय) हे तीन कायदे अस्तित्वात आले आहेत.
(The three criminal bills to replace the Indian Penal Code IPC enacted into law after President Droupadi Murmu gave her assent knp94)
फौजदारी प्रक्रियेशी संबंधित तिन्ही विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मंजूर झाली होती. त्यानंतर ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्यात आली. राष्ट्रपतींनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केली असल्याने त्यांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. ब्रिटिश काळांपासून लागू असलेल्या जुन्या फौजगारी कायद्यांना हटवून त्यांचे भारतीयकरण या कायद्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. (Tarun Bharat live)