Bangladeshi infiltrators : जळगाव बनतोय बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा ? ‘या’ तीन प्रकरणांतून उघड होतंय धक्कादायक रॅकेट!

---Advertisement---

 

जळगाव : शांत आणि प्रगतिशील म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्याला सध्या एका चिंताजनक समस्येने ग्रासले आहे. अर्थात बांगलादेशी घुसखोरी आणि त्यातून पसरत चाललेला देहविक्रीचा व्यवसाय. अवघ्या तीन महिन्यांत (मे, जुलै आणि ऑगस्ट) उघडकीस आलेली तीन गंभीर प्रकरणं प्रशासनाला हादरवून टाकणारी ठरली असून, यामुळे जळगाव बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा बनतोय का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी 27 मे 2025 रोजी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले होते. भुसावळ शहातील जामनेर रोडवरील एका हॉटेलमध्ये रूम बुक करताना, त्यांनी केवळ झेरॉक्स आधारकार्ड दाखवले. यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्या बांगलादेशी निघाल्या. त्यांचे नाव तानिया मुळशीर अहमद (वय 26, जिल्हा ढाका, बांगलादेश) व करीमा बोकूलमिया अख्तर (वय 22, बाव्हम बरिया, बांगलादेश) असे असल्याचे त्यांनी पोलीस चौकशीत सांगितले.

बांगलादेशी तरुणीला बंदिस्त ठेवून देहविक्रीचा व्यवसाय

जळगाव शहरातील प्रोफेसर कॉलनीत राहणारी एका महिला एका बांगलादेशी तरुणीला बंदिस्त ठेवून तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होती. ही घटना 25 जुलै 2025 रोजी उघडकीस आली होती. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकुर यांना माहिती मिळताच, ही कारवाई करण्यात आली. यात बांगलादेशी तरुणीची सुटका, तर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या महिलेवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी दिली.

हॉटेलमध्ये बांगलादेशी महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय

जळगावच्या एमआयडीसी परिसरातील हॉटेल तारामध्ये काही बांगलादेशी महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात होता. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना माहिती मिळाली. त्यांनी एएचटीयू पथकास सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला असता, या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश झाला. या कारवाईत हॉटेल मालकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अन्य एक महिला व दोन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांगलादेशी घुसखोरांचं रॅकेट?

एकूणच काय तर, या प्रकरणातून बांगलादेशी घुसखोरांचं रॅकेट कार्यरत असल्याचे संकेत नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या मोहिमेअंतर्गत, शहरातील जन्माची आणि विवाहाची नोंदणी, तसेच विविध ठेकेदारांकडे काम करणाऱ्या मजुरांची माहिती तपासली जाईल. तसेच, बेकायदेशीररित्या मिळवलेली आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचीही पडताळणी केली जाईल. रस्त्यावर विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांची माहिती गोळा केली जाणार आहे.

याव्यतिरिक्त, घरमालकांना त्यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक केले आहे. शहरात कोणत्याही बांगलादेशी नागरिकाला भाड्याने घर देऊ नये, अशी ताकीदही घरमालकांना देण्यात आली आहे.

या कामात महानगरपालिका पोलिस विभागाचेही सहकार्य घेणार असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. शहरात कुठेही बांगलादेशी नागरिक आढळल्यास, त्यांची सर्व कागदपत्रे तपासली जातील आणि ती अवैध आढळल्यास रद्द करण्यात येतील. नागरिकांनी कोणत्याही बांगलादेशी व्यक्तीला कामावर ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---