---Advertisement---

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा

---Advertisement---

जम्मू काश्मीर । जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले. तर दोन जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे. या चकमकीनंतर आता सुरक्षा दलांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएस या भागातील कद्देर या गावाजवळ ही चकमक सुरु असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील कद्दर भागातील बेहिबाग परिसरामध्ये आज गुरुवारी सकाळी लष्कर आणि पोलिसांना या परिसरात ४-५ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती होती. लष्कराला ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक चकमक झाली आहे. ज्यामध्ये अनेक दहशतवादी आणि त्यांचे कमांडर मारले गेले आहेत. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे जवानही जखमी झाले आहेत. काश्मीरमधील श्रीनगर आणि जम्मूमधील चिनाब खोरे, उधमपूर आणि कठुआ यासारख्या भागांमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment