धडगाव : सारंगखेडा येथे चेतक फेस्टिव्हलमध्ये तिनसमाळ (ता.धडगाव) येथील नर्मदा परिसर बीज बँकेने बी-बियाणांचे प्रदर्शन मांडून अनेकांचे लक्ष वेधले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करताना पारंपरिक शाश्वत बी-बियाणांचे प्रदर्शन चेतक फेस्टिव्हल सारंगखेडा येथे लावण्यात आले. यावेळी कृषी विभागाकडून देखील विविध प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यामध्ये तिनसमाळ येथील बीज बँकेने पारंपरिक शाश्वत अश्या बांबू पासून तयार केलेली कणगी, नैसर्गिक भोपळ्यापासून तयार केलेल्या वाट्यामध्ये बी-बियाणे ठेवून आकर्षण निर्माण केले. नुसते प्रदर्शन नव्हे तर ऑरगॅनिक पौष्टिक असलेल्या तृणधान्याचे महत्व पटवून वापरात आणण्याची जनजागृती केली.
पारंपरिक धान्याचे आपल्या रोजच्या आहारात समावेश करण्यात यावा याने अधिक गुणकारी असे जीवनसत्त्वे मिळते. जे आज लुप्त होण्याचा मार्गावर आहे. आज रासायनिक खतांचा वापर होत असल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे पारंपरिक बी-बियाणांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी बीज बँकेचे संचालक लक्ष्मण मोगरा पावरा, राकेश जोरदार पावरा, अर्जुन राजेंद्र पावरा, कृषी विभागाचे विजय भलकारे,जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.