आत्मनिर्भर भारताचे विश्वकर्मा

अग्रलेख

‘कुशल कारागीर व शिल्पकार हे आत्मनिर्भर, (PM Vishwakarma Skill Award) स्वावलंबी भारताच्या तत्त्वाचे खरेखुरे प्रतीक आहेत आणि आमचे सरकार या कारागिरांना नवभारताचे विश्वकर्मा मानते,’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मविश्वासपूर्ण उद्गार देशाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्टपणे अधोरेखित करतात.

जबरदस्त इच्छाशक्ती, विलक्षण क्रियाशक्ती, सकारात्मक मानसिकता, दुर्दम्य आशावाद आणि भविष्याविषयी सुस्पष्ट संकल्पना यांचे एकात्मिक चित्र म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ प्रणीत भाजपा आघाडीचे सरकार. 100 वर्षं जुना व आता प्रामु’याने विरोधी पक्ष म्हणून भूमिकेत असलेला काँग्रेस पक्ष आणि अन्य विरोधी पक्षांचे नेते केंद्राविरुद्ध सतत नकारात्मक प्रचार करीत असताना व विदेशातही भारताची बदनामी करीत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता देशाच्या विकासासाठी सातत्याने नवनवीन संकल्पना राबवतो, हे दृश्य निश्चितच सुखावणारे व दिलासादायक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (PM Vishwakarma Skill Award) ‘पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ या विषयावरील वेबिनारला मार्गदर्शन करताना जे विचार व्यक्त केले ते सामर्थ्यशाली आणि आत्मनिर्भर भारताचे नवे स्वरूप स्पष्ट करणारे आहेत. भारताची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, देशातील प्रचंड संख्येतील तरुणाई, कुशल मनुष्यबळ, अफाट पायाभूत सुविधा, वैद्यकीय, कृषी, रसायन, अभियांत्रिकी, संरक्षण उत्पादन, ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान तसेच प्रचंड मोठी बाजारपेठ आणि येथील ग्राहक शक्ती ही भारताची बलस्थाने आहेत. भारताचा अभूतपूर्व व झपाट्याने उत्कर्ष होत आहे. आपण संपूर्ण जगाचे गुंतवणूक आणि संधींचे सर्वाधिक पसंतीचे स्थान बनलो आहोत आणि हस्तकला, हातमाग, शिल्पकला क्षेत्राशी संबंधित कारागिरांनी या वृद्धीमध्ये आपली भूमिका बजावली आहे. हे कारागीर आपल्या संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत. देशातील विविध हस्तव्यवसायांची परंपरा ही प्राचीन असून त्यात कलात्मकता, उपयुक्तता, सर्जनशीलता व उच्च मूल्ये यांचे मनमोहक असे मिश्रण आहे. धार्मिक श्रद्धा, चालीरिती, सामाजिक आचार-विचार, आर्थिक व्यवहार यांचे प्रतिबिंब हस्तव्यवसायावर पडल्याचे आढळून येते.

भरतकाम, काष्ठशिल्प, वस्त्रकला, धातुकाम अशा अनेक पारंपरिक कलांचा उगम (PM Vishwakarma Skill Award) या देशात झाला. विशेषत: या सर्व हस्तव्यवसायांची निर्मिती व विस्तार याच भूमीतील साधने वापरून लोकांच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी झाला. बनारसी व चंदेरी साड्या, कांजीवरम-सिल्क, काश्मिरी शाली, सांगानेरी प्रिंटस, मुरादाबादी भांडी, जोधपुरी फर्निचर इत्यादी अनेक ब्रँड नावे आहेत की, ज्यांनी अनेक शतकांपासून आपली ओळख निर्माण केली आहे. या ब्रँड नावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ओळख व लोकप्रियता ही उत्पादनांची निर्मिती व त्याच्याशी जोडलेल्या हस्तकलेच्या कारागिरांचे कठोर परिश्रम, सृजनात्मकता, कौशल्य आणि व्यवसायाप्रती असलेली निष्ठा यांचा एकत्रित परिणाम आहे. हस्तकला, शिल्पकला आणि हातमाग म्हणजे उर्वरित जगाशी आत्मविश्वासाने आणि स्वयंपूर्ण होऊन व्यवहार करणार्‍या भारताचा जणू पायाच आहे. आपल्या कारागिरांनी व शिल्पकारांनी अनेक शतकांपासून दगड, धातू, चंदन आणि माती यामध्ये जिवंतपणा आणणारी आपली स्वत:ची आगळी शैली, वेगळ्या पद्धती आणि तंत्र विकसित केले आहे. अगदी प्राचीन काळापासून त्यांनी काळाच्या कितीतरी पुढे जात विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रकि’यांमध्ये प्रावीण्य आत्मसात केले होते. त्यांच्याकडे असलेले आधुनिक ज्ञान आणि अतिशय उच्च सौंदर्यदृष्टी यांची प्रचीती त्यांच्या निर्मितीमधून आली.

हस्तकला उत्पादनांमुळे ग्रामीण भागात राहणार्‍या लाखो लोकांना अतिशय अल्प भांडवली गुंतवणुकीमध्ये चरितार्थाच्या संधी मिळत आहेत आणि या उत्पादनांना स्थानिक आणि परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. (PM Vishwakarma Skill Award) या हस्तकला भारताचा वारसा, संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहेत व भारताच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोलाचे योगदान आहे. हस्तकला उत्पादने, घरातली इतर कामे करत असताना घरीच तयार करता येणे शक्य असल्याने, ग्रामीण भागात राहणार्‍या महिलांच्या सक्षमीकरणामध्ये हस्तकला उत्पादनांचे विशेष महत्त्व आहे. या व्यवसायातील मनुष्यबळामध्ये महिलांचा वाटा मोठ्या प्रमाणावर आहे आणि कारागीर क्षेत्रात हे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा आहे, याची दखल मोदी सरकारने घेतली आणि त्यादृष्टीने कृतियोजना हाती घेतली यामुळेच ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा आलेख उंचावला, याची जागतिक बँकेनेही नोंद घेतली आहे.

जी-20 देशांचे अध्यक्षपद भारताकडे असल्याने व त्यानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रम देशात होणार असल्याने जगातील विकसित व विकसनशील देशांच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. भारत आपली विकासात्मक वाटचाल कशाप्रकारे करीत आहे, याकडे तेथील अर्थतज्ज्ञांचे लक्ष असते. (PM Vishwakarma Skill Award) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेतील अर्थतज्ज्ञही भारताच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीचे मापन आपापल्या पद्धतीने करतच असतात. या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मोदी सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना देशातील कुशल कारागिरांच्या मनुष्यबळाला आर्थिक व तंत्रविषयक पाठबळ पुरवण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या विशेष प्रयत्नांची यापूर्वीच दखल घेतली होती. सरकारच्या या दृढ निर्धाराचे व इच्छाशक्तीचे प्रकटीकरण मोदींच्या शनिवारच्या भाषणात प्रतिबिंबित झाले एवढेच. भारताच्या विकासाच्या प्रवासात गावातील प्रत्येक घटकाला त्याच्या विकासासाठी सक्षम करणे आवश्यक आहे आणि आपल्याला देशाच्या विश्वकर्मांच्या अर्थात कारागीर व शिल्पकारांच्या गरजांनुसार कौशल्य व पायाभूत सुविधा व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे नमूद केले.

कोट्यवधी ग्रामीण कारागीर व शिल्पकारांमध्ये जे कौशल्य आहे त्याच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांसाठी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, हे मोदी सरकारने अचूक ओळखले आणि त्यादृष्टीने कृतियोजना हाती घेतली. त्यामुळेच भारताच्या भावी विकास यात्रेत या (PM Vishwakarma Skill Award) कारागिरांचे व शिल्पकारांचे योगदान मोठ्या प्रमाणात असेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. भारतासारख्या विकसनशील देशाचा विचार करता, लघुउद्योगाद्वारे भांडवल व इतर संसाधनात वाढ केली पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे कुशल कारागीर हे लघुउद्योगासाठी सहज उपलब्ध आहेत. लघुउद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करता येतो. पंतप्रधानांनी कारागीर आणि शिल्पकारांचे लघुउद्योगातील स्थान स्पष्ट केले आहे. त्यांना दर्जेदार प्रशिक्षण दिले, त्यांचे तांत्रिक कौशल्य वाढविले आणि त्यांना कर्जसुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्यांच्यापैकी अनेक जण एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्रासाठी पुरवठादार आणि उत्पादक बनू शकतात, हा पंतप्रधानांनी व्यक्त केलेला विश्वासही सार्थ असाच आहे. या लोकांना त्यांच्या गरजांशी जोडून उद्योग क्षेत्र आपले उत्पादन वाढवू शकते, जिथे कौशल्यपूर्ण आणि दर्जेदार प्रशिक्षण दिले जाऊ शकते. गावखेड्यातील कुशल कारागीर व शिल्पी हे उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत.

कारागिरांचे अनेक वर्ग जसे की सुतार, लोहार, शिल्पकार, गवंडी आणि इतर अनेक जे समाजाचा अविभाज्य भाग आहेत आणि ते दुर्लक्षित समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बदलत्या काळाशी जुळवून घेत आहेत. या वर्गाची आतापर्यंत झाली तेवढी उपेक्षा खूप झाली. आता या वर्गाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे आणि त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, ही पंतप्रधानांची भावना (PM Vishwakarma Skill Award) देशातील कोट्यवधी उपेक्षितांना बळ देणारी आहे. या लोकांसाठी विशिष्ट आणि लक्ष्यित दृष्टिकोन अवलंबल्यास ग्रामीण भारताचे चित्र पालटल्याशिवाय राहणार नाही. गाव खेडी तसेच शहरात वास्तव्य करून स्वतःच्या हस्तकलेच्या आधारावर आपली गुजराण करणारे असे कुशल कारागीर अर्थात आजचे विश्वकर्मा उद्याचे उद्योजक होऊ शकतात, हा पंतप्रधानांनी व्यक्त केलेला विश्वास वास्तवाला धरूनच आहे. पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांच्या समृद्ध परंपरा जपत त्यांचा विकास करण्याचा पंतप्रधानांनी व्यक्त केलेला संकल्प आत्मनिर्भरतेच्या व नवीन भारताच्या वाटचालीला अधिकाधिक ग