भरधाव दुचाकींची समोर समोर धडक, ज्येष्ठ नागरिक ठार, दोघे जखमी

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे. यातच एरंडोल तालुक्यातून दोन दुचाकींच्या अपघाताची बातमी येत आहे. हा अपघात एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या दुचाकीने जोरदार टक्कर दिल्याने अपघात झाला, हा अपघात एवढा भीषण होता की, एका दुचाकीवरील जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसावद रस्त्यावरील पद्मालय फाट्याजवळ घडली आहे. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एरंडोल- म्हसावद रस्त्यावर घडलेल्या दुचाकींच्या अपघातात पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथील संजय माणिक पवार (वय ६०) असे मृत झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. संजय पवार हे सोमवारी दुपारी एकच्या सुमारास एरंडोलकडे जात होते. त्याचवेळी म्हसावदकडे भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाने संजय पवार यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर फेकले गेले.

संजय पवार यांच्यासह बाळा पंकज कोळी व संजय नामदेव कोळी हे रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात संजय पवार यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय कोळी व बाळा कोळी गंभीर जखमी झाले. यावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र संजय पवार यांचा मृत्यू झाला. तर जखमींवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

जळगाव : जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे. यातच एरंडोल तालुक्यातून दोन दुचाकींच्या अपघाताची बातमी येत आहे.या अपघात एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या दुचाकीने जोरदार टक्कर दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, एका दुचाकीवरील जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसावद रस्त्यावरील पद्मालय फाट्याजवळ घडली आहे. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एरंडोल- म्हसावद रस्त्यावर घडलेल्या दुचाकींच्या अपघातात पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथील संजय माणिक पवार (वय ६०) असे मृत झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. संजय पवार हे सोमवारी दुपारी एकच्या सुमारास एरंडोलकडे जात होते. त्याचवेळी म्हसावदकडे भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाने संजय पवार यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर फेकले गेले.

संजय पवार यांच्यासह बाळा पंकज कोळी व संजय नामदेव कोळी हे रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात संजय पवार यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय कोळी व बाळा कोळी गंभीर जखमी झाले. यावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र संजय पवार यांचा मृत्यू झाला. तर जखमींवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

---Advertisement---