---Advertisement---
चंद्रपूर : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यानं सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगावर खळबळजनक विधान केल आहे.
काय विधान केलय?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी म्हणाले, आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे अशी घणाघाती टीका केली आहे.
सत्तेवर बसलेली माकडं आहेत आणि ती विकली गेली आहेत असे सांगत न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, रक्तपात झाला तरी चालेल अशी टोकाची भूमिका शरद कोळी यांनी मांडली.
आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळाले पाहिजे सोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे असेही शरद कोळी यांनी मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याच दरम्यान शरद कोळी हे खळबळजनक विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. न्याय आमच्याच बाजूने लागेल असे म्हणत शरद कोळी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर हल्लाबोल केला आहे.









