सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा विक्रमी उच्चांकावर

तरुण भारत लाईव्ह | मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक आणि रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये झालेल्या दमदार खरेदीच्या बळावर गुरुवारी सेन्सेक्सने तसेच निफ्टीने पुन्हा एकदा विक’मी उच्चांक गाठला आहे.

 

जागतिक बाजारात कमकुवत स्थिती असतानाही मुंबई stock market शेअर बाजाराचा निर्देशांक 339 अंकांनी उसळून 65,785 या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. दिवसभराच्या सत्रादरम्यान निर्देशांकाने 386 अंकांची उसळी घेतली होती.

 

राष्ट्रीय stock market शेअर बाजाराचा निफ्टी 98.80 अंकांनी उसळून 19,497 या नवीन उच्चांकावर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक सुरूच असून, बुधवारी त्यांनी 1,603.15 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. गुरुवारी सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 301.10 लाख कोटी या सर्वकालीन उच्चांकावर

पोहोचले.